ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटी आणि ह्यूमन राईट ऑर्गनायझेशन च्या जिल्हाध्यक्षपदी संदीप सरदेसाई यांची निवड

कोल्हापूर :
नवी दिल्ली येथे मुख्य कार्यालय असलेल्या ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटी आणि ह्युमन राईट ऑर्गनायझेशन यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते संदीप सरदेसाई यांच्या विविध सामाजिक आणि लोकोपयोगी कामाची दखल घेऊन त्यांची कोल्हापूर जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी निवड केली. नुकतेच त्यांना या निवडीचे पत्र देण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्यातील प्रशासनिक कामांमध्ये लोकांना येणाऱ्या विविध अडचणींचा सामना करावा लागतोय, यामध्ये गोरगरीब जनतेची फरपट होऊ नये तसेच सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी या पदाचा वापर करणार असल्याचे संदीप सरदेसाई यांनी निवडीवेळी सांगितले.
ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटी आणि ह्युमन राईट ऑर्गनायझेशन जिल्हा प्रशासनासोबत संयुक्तपणे काम करेल तसेच सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सदैव ही संस्था तत्पर राहील, असे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष संदीप सरदेसाई यांनी यावेळी सांगितले.
यासाठी संस्थापक अध्यक्षा चेतना सकुंडे आणि राष्ट्रीय कार्यकारणी अध्यक्ष जितेंद्र सकपाळ यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे संदीप सरदेसाई यांनी सांगितले.