ताज्या बातम्यामहाराष्ट्र
शिवाजी विद्या मंदिर शाळा नंबर 2 मुरगूड च्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विजय मेंडके तर उपाध्यक्षपदी रेणू सातवेकर यांची निवड

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड ता.कागल येथील शिवाजी विद्यामंदिर शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विजय कृष्णात मेंडके यांची तर उपाध्यक्षपदी सौ.रेणू राजकिरण सातवेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली
यावेळी निवड समितीच्या अध्यक्षपदी माजी अध्यक्ष फौजी निशांत जाधव तर प्रमुख उपस्थिती मुख्याध्यापक प्रविण आ़ंगज, आनिल बोटे होते.
यावेळी इतर सदस्य अमर(छोटू )चौगुले ,फौजी निशांत जाधव,रणजित डोंगळे,सौ जयश्री मोरबाळे ,सौ सुनिता संजय उपलाने,सौ अश्विनी गुरव, मेघा डेळेकर सौ. संगीता कांबळे,तर सचिव पदी प्रविण आंगज. यांची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी , राजू चव्हाण,संदिप सांरग, सुरेश शिंदे, रणजित भारमल,सविता धबधबे आदी उपस्थित होते.स्वागत अनिल बोटे तर प्रास्ताविक प्रविण आंगज सर यांनी केले तर आभार मंकरंद कोळी सर यांनी मानले.