‘ स्वराज्य ‘ चे सामाजिक कार्य कौतुकास्पद : के.एस.चौगले

बिद्री प्रतिनिधी /अक्षय घोडके
बिद्री येथील स्वराज्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने महापूर, कोरोनासारख्या आपत्ती वेळी केलेले सामाजिक कार्य आदर्शवत आहे. सामाजिक भान ठेवून काम करणाऱ्या अशा व्यक्ती आणि संस्थांची आजच्या समाजाला गरज असून ‘ स्वराज्य ‘ चे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोदगार बिद्री साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक के.एस. चौगले यांनी काढले.
बिद्री ( ता. कागल ) येथील स्वराज्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व स्वराज्य रेस्क्यू फोर्सच्या कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीवेळी ते बोलत होते. यावेळी बिद्रीच्या दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती झाल्या निमित्त स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय वारके यांच्या हस्ते के.एस. चौगले यांचा सत्कार करण्यात आला.
‘ स्वराज्य ‘ चे अध्यक्ष दत्तात्रय वारके यांनी स्वागत करुन उपस्थितांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली. यावेळी पत्रकार सुनील खोत, सुनील माजगावकर, अक्षय घोडके,रणजीत कांबळे,अजित घोरपडे, संस्थेचे सचिव सुरज घोडके आदी उपस्थित होते. आभार आकाश वारके यांनी मानले.