शाश्वत विकास चळवळीच्या माध्यमातून गरीब गरजूंना जीवनावश्यक वस्तु देणार : अध्यक्ष प्राचार्य डॉ.ए डी कुंभार.

गारगोटी प्रतिनीधी :
सध्याच्या कोरोना महामारीच्या या मोठ्या लॉकडाऊनच्या काळात भल्याभल्या उद्योगपतींचे धाबे दणाणले तर हातावर पोट भरून खाणाऱ्यांची झालेली दुर्दशा कल्पनेच्या पलिकडची आहे. सर्वसामांन्य मजूर, गोरगरीब शेतकऱ्यांच्या चूली बंद होत आल्या आहेत. अशांना मानवतावादी जाणीव ठेवून, शाश्वत विकास चळवळ गारगोटीच्या माध्यमातून प्रापंचिक साहित्याचे थोडेफार साहित्य देवून अशा लोकांना थोडा आधार देवून त्यांचे आश्रू पुसणार असल्याचे या शाश्वत विकास चळवळीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.ए डी कुंभार यांनी याप्रसंगी सांगितले.
याबद्दल अधिक माहिती देताना प्राचार्य ए डी कुंभार म्हणाले की आंम्ही यासाठी मदतीचे आव्हान केले आहे. सर्वसामांन्य माणूस जगला पाहिजे. तो या कोरोना महामारीतून तरला पाहिजे त्याला किमान दोन वेळचे पोटाला मिळाले पाहिजे. त्याच्या घरातील चूल पेटली पाहिजे या हेतूने आंम्ही कार्यरत झालो आहोत. यासाठी जास्तीत जास्त दात्यांनी पूढे यावे. दातृत्वाचा हा आदर्श आपण सर्वांना घालून देवूया. यासाठी आजच गारगोटीच्या प्रोफेशनल ग्रुपच्या १२ सदस्यांनी रु २५,०००/- चा निधी आमच्याकडे जमा केलेला आहे. मदतीचा ओघ सुरु झाला आहे. अशा सर्व दात्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. आमच्यासोबत भुदरगड जेष्ठ नागरिक संघ, अक्षरसागर साहित्य मंच, संवेदना प्रतिष्ठान आदि संस्था सहभागी होत आहेत. या मदतीच्या अभियानात सहभागी होवू इच्छिणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी मदत निधी सुपुर्द करण्यासाठी निवृत्त प्राचार्य बी एस माने फोन नं ( ९४२२०२७०३४), पत्रकार आनंद चव्हाण फोन नंबर ( ९४२३८४१८११) व श्री महमद जमादार फोन नं (९४२३२८०७००) यांना संपर्क साधण्याचे आवाहन अध्यक्ष प्राचार्य डॉ.ए डी कुंभार यांनी याप्रसंगी केले आहे.