राधानगरी येथे असणाऱ्या कोवीड सेंटरला मदत करण्याचे सुशील पाटील कौलवकरांचे आवाहन

कौलव प्रतिनीधी
राधानगरी येथे सुरु असलेल्या काेविड सेंटरमध्ये आपल्या तालुक्यातील अनेक गाेरगरीब रुग्णांवर काेराेनाचे उपचार सुरु आहेत.या सेंटरला अनेकांनी आतापर्यंत सामाजिक बांधिलकीच्या भावनेतुन मदत केली आहे.तरीही अजुन या काेविड सेंटरला जवळपास शंभर सिंगल बेड गाद्यांची गरज आहे तरी आपल्या समाजातील,विविध सेवाभावी संस्था, दानशुर व्यक्ती,सामाजिक,सहकारी,शैक्षणिक संस्था यांनी या गाद्यांची मदत करावी असे आवाहन करीत आहे.आज काेराेनाच्या या संकटाच्या काऴात या काेविड सेंटरमधुन आपल्या माणसांच्यावर चांगल्याप्रकारे उपचार सुरु आहेत.म्हणुन या सेंटरला मदत करुन.माणुसकीचे दर्शन घडवुया….! ज्यांना आपल्या परीने मदत करायची आहे.त्यांनी मंगळवारी ता.1 जुन राेजी सकाळी अकरा वाजता गाद्यांसह राधानगरी तहसीलदार कार्यालय येथे उपस्थित रहावे असे आवाहन राधानगरी मतदार संघाचे काॕग्रेसचे समन्वयक सुशील पाटील कौलवकर यांनी केले आहे