ताज्या बातम्यामहाराष्ट्र

डोंगरांना आगी,वणवे लावण्याचे प्रकार थांबवा ; शाश्वत विकास चळवळीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार यांचे आवाहन

मुरगुड प्रतिनिधी :विजय मोरबाळे

सध्या ऐन उन्हाळ्याचे दिवस असून होळी सण साजरा करण्यात येतो अंधश्रद्धेतून कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागातील अनेक डोंगरांना आगी,वणवे लावण्याचे प्रकार घडतात, त्यातून अनेक
जीवजंतू, वनस्पती नष्ट होऊन पर्यावरणाची हानी होते. हे टाळण्यासाठी येथील शाश्वत विकास चळवळीने जिल्ह्यातील सर्व सरपंचांना डोंगरांना वणवे लावू नका व याबाबत गावक-यांचे प्रबोधन करण्याचे व दक्षता समित्या स्थापन करण्याचे
कळकळीचे आवाहन केले आहे.

शाश्वत विकास चळवळीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, कुणीही शेतातील पाला-पाचोळा,बांध, डोंगर आदी पेटवू नये.डोंगर,पडसर गवताचे वावर,शेतातील पाला-पाचोळा पेटवला तर,जमिनीवर असणारे लाखो जीव जंतू, किटक, सरपटणारे प्राणी, अनेक पक्षी त्यांची पिलं आणि अंडी, शेवाळ, यांचा नाश होतो. झाडे-झुडपे  देखील जळून खाक होतात.

             गवत पेटवल्याने नवीन गवत चांगले येते ही गैरसमजुत शेतकरी वर्गात आहे. गवत पेटवल्याने हजारो प्रजाती नष्ट होत आहेत. नवीन गवत हे कमकुवत व कस नसलेले येते. याचा अनुभव शेतकऱ्यांना आहे.आपल्याला उपयोगाची नाही अशी झाडे-झुडपे ही निसर्गचक्रासाठी उपयुक्त असतात. या झाडाझुडपामध्ये  अनेक औषधी गुणधर्म असतात.त्यामुळे अशा वनस्पती वणव्याने जळून खाक होतात व त्यांच्या प्रजाती नष्ट झाल्याने त्या पुन्हा निर्माण होत नाहीत.

वणवा लावून, झाडे तोडून माणूस स्वतः चे कुटुंब जाळत आहेत हे समजायला उशीर होण्या आधी सावध होऊया. निसर्ग वाचवूया. निसर्ग वाचला तरच आपण वाचू हे समजून घेऊया.
           या सर्व झाडे, झुडपे व पशु पक्षी, कीटक आणि जीव जंतूमुळेच जमिनीची पाणी साठवण्याची क्षमता वाढते व जमिनीचा पोत सुधारण्याचे काम नैसर्गिकरित्या पार पडत असते. या मध्ये जीवजंतू,किटाणू,शेवाळ  ,डोंगळे- मुग्या या सर्वांचा महत्वाचा सहभाग असतो. हे सर्व सजीव निसर्ग वाचवण्यामध्ये आणि समृद्ध बनविण्यात  या निसर्ग चक्रामध्ये सक्रिय असतात.

          वणवे लावून माणूस निसर्गचक्रा मध्ये ढवळा-ढवळ करत असल्यामुळे आज तापमान वाढ,उष्माघात या सारख्या भयंकर संकटाला सामोरे जावे लागत आहे. जमिनीचे मोठया प्रमाणावर होत असलेले सपाटीकरण, जंगलतोड, रस्ते रुंदीकरणात मोठ्या वृक्षांची तोड यासारख्या बाबीमुळे  तापमान इतके वाढले आहे की,अक्षरशः शरीराला चटके बसत आहेत.मानवी कातडी जळत असल्याचे जाणवत आहे. हे इतके भयंकर आहे की,या वर कोणतेही औषध नाही.

यावर एकच उपाय,एकच औषध आहे ते म्हणजे,
‘झाडे लावणे, झाडे जगविणे आणि झाडे वाढविणे.तेव्हा आपल्या हातून चुकूनही वणवा लागता कामा नये.

यासाठी चला तर यावर्षी पासून

“आम्ही गावकरी कोणत्याही परिस्थितीत वणवा लावणार नाही” ही शपथ घेऊ या.

“झाडे लावूया. झाडे जगवूया, निसर्ग जगवुया”

यातच मानव जातीची सुरक्षितता आहे. मानव जातीचे कल्याण आहे.असे या पत्रात म्हटले आहे
                

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks