ताज्या बातम्यामहाराष्ट्र
शाहूनगर मध्ये तरुणाची आत्महत्या

मुरगुड प्रतिनिधी :
शाहूनगर (ता. कागल) येथे अकरावीत शिकणाऱ्या विघ्नेश सुरेश रावण (वय १७, रा. शाहूनगर, ता. कागल) याने गुरूवारी दुपारी चार ते सहाच्या दरम्यान कोणत्यातरी अज्ञात कारणास्तव राहत्या घरातील जिन्याच्या वरील तुळीला दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. याबाबतची वर्दी ऋतुराज सुरेश रावण यांनी मुरगूड पोलिसांत दिली असून, घटनेची नोंद पोलिसांत झाली आहे.