गुन्हाताज्या बातम्यामहाराष्ट्र

कागल तालुक्यातील अवचितवाडी येथे भावाला मारहाण केल्याच्या रागातून ऊसतोड कामगाराचा निर्घृण खून

अकोला जिल्ह्यातील तिल्हारा तालुक्यातील संजय फुलचंद जामूनकर रा. वारी हनुमान असे खुन झालेल्याचे नाव आहे.

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

कागल तालुक्यातील अवचितवाडी येथे भावाला मारहाण केल्याच्या रागातून ऊसतोड कामगाराने संजय फुलचंद जामूनकर (रा. वारी हनुमान- भैरोगड, ता. तिल्हारा, जि. अकोला) या ऊसतोड कामगाराच्या डोक्यात लाकडी ओंडका घातल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री घडली. या प्रकरणी मुरगूड संजय जामूनकर पोलिसांनी सुनील नंदूलाल मावसकर या संशयिताला अटक केली आहे.

अकोला जिल्ह्यातील तिल्हारा तालुक्यातील संजय फुलचंद जामूनकर रा. वारी हनुमान असे खुन झालेल्याचे नाव आहे.

ही घटना अवचितवाडी ता. कागल येथे सोमवारी रात्री घडली. मुरगूड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद आज पहाटे करण्यात आली. आरोपी सुनील जामुनकर याला मुरगुड पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अवचितवाडीत विनायक मोरबाळे यांच्या ट्रेक्टरवर ऊसतोड टोळीमध्ये मयत संजय फुलचंद जामूनकर आणि आरोपी सुनील नंदूलाल जामुनकर हे दोघे ऊसतोड कामगार होते. एकाच गावात राहणारे हे दोघे एकमेकांचे चांगले मित्रही होते. काल रात्री ९ वा. च्या सुमारास करी नावाच्या शेतात गट नं. ५८ मध्ये उसतोड चालू असताना संजय जामुनकर याचे सुनिलचा भाऊ असणाऱ्या अनिल जामुनकर बरोबर किरकोळ कारणावरुन भांडण सुरू होते. ‘माझ्या भावाबरोबर तू का भांडत आहेस ? ‘ असा जाब विचारत सुनिलने संजयच्या डोक्यात लाकडी ओंडका मारला वर्मि बसल्याने संजय जागेवरच कोसळला.

ट्रॅक्टर मालक विनायक मोरबाळे यांनी गंभीर जखमी अवस्थेत संजयला मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. वैद्यकिय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच संजय मयत झाल्याचे सांगितले. विनायक शंकर मोरबाळे रा. अवचितवाडी यांनी घटनेची मुरगूड पोलिसात फिर्याद नोंदवली. ग्रामीण रुग्णालयात मयताचे शवविच्छेदन झाल्यावर नातेवाईकांनी पहाटे मृतदेह गावी अंत्यसंस्कारासाठी नेला. गुन्ह्याची नोंद पहाटे अडीच वा.च्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक कुमार ढेरे यांनी केली. अधिक तपास मुरगूड पोलीस करत आहेत.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks