वस्त्रोद्योगातील कापड विक्रीसाठी नव्या वर्षात जीएसटी कर वाढणार ; करवाढीमुळे गुंतवणुकीवर होणार मोठा परिणाम

कोल्हापूर प्रतिनिधी :
विविध कारणांवरून वस्त्रोद्योग आधीच आर्थिक अरिष्टातून मार्गक्रमण करीत असताना वस्त्रोद्योगातील कापड विक्रीसाठी 2022 सालापासून जीएसटी कर 5 टक्क्यांवरून 12 टक्क्यांवर वाढवण्यात आला आहे. जीएसटी हा संपूर्ण वस्त्रोद्योगावर लागू करणे आवश्यक असताना निव्वळ कापड विक्रीवर लागू करण्यात येणार असल्यामुळे वस्त्रोद्योगातील, विशेषत: व्यापारी, यंत्रमागधारक यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
नव्या करवाढीमुळे कापड उद्योगातील गुंतवणुकीवर मोठा परिणाम होणार असून यंत्रमागधारक व व्यापारी यांच्यातही जीएसटीच्या करावरून संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. आर्थिक मंदी, नोटाबंदी, जीएसटी, दररोज वाढत असणारे सुताचे दर, लॉकडाऊनमुळे थकलेले कर्जाचे हप्ते, कापडाला नसलेला दर आदी विविध संकटातून वस्त्रोद्योग विशेषत: कापड उत्पादन व विक्री मार्गक्रमण करीत आहे.