गडहिंग्लज पंचायत समितीचे यश कौतुकास्पद! पंडित दीनदयाळ उपाध्याय अभियानातील प्रथम क्रमांकाबद्दल मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला सत्कार

कोल्हापुर : रोहन भिऊंगडे
केंद्र सरकार व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायतराज सशक्तीकरण अभियानात गडहिग्लज पंचायत समितीने केलेले काम कौतुकास्पद आहे. पंचायत समितीच्या या उत्तुंग यशात पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांसह अधिकारी कर्मचारी, गावागावातील ग्रामपंचायती व ग्रामस्थांचे योगदान मोठे आहे.
गडहिंग्लज पंचायत समितीच्या या यशाबद्दल ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पंचायत समितीच्या सभापती सौ. रुपाली गौतम कांबळे, उपसभापती हीराप्पा शंकर हासुरे, गटविकास अधिकारी शरद मगर व सहाय्यक गटविकास अधिकारी आनंद गजगेश्वर यांचा सत्कार शासकीय विश्रामगृहात झाला.
यावेळी सभापती सौ. कांबळे म्हणाल्या, गडहिग्लज पंचायत समितीने केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध शासकीय , सामाजिक योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली. पंचायत समितीपासून ग्रामपंचायती व गावागावातील जनतेपर्यंत सर्व योजनांचा पाठपुरावा करून हे अभियान शंभर टक्के यशस्वी केले. पंचायत समितीचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्या संघटित कष्टाचे हे फलित आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सतीश पाटील, अमर चव्हाण व इतर प्रमुख उपस्थित होते.