खा. नारायण राणेंच्या केंद्रीय मंत्रिपदाचा कोल्हापुरात फटाके फोडून जल्लोष

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
आज कोकणचा ढाण्या वाघ खास. नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे आता खास. नारायण राणे केंद्रीय मंत्री म्हणून कार्यभार सांभाळायला सिद्ध झाले आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला मंत्रीमंडळ विस्तार आज सायंकाळी 6 वाजता संपन्न झाला. यावेळी कोकणचा कणखर आवाज खास. नारायण राणे यांनी आपल्या मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे कोल्हापुरातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तसेच राज्यभरातील राणेसमर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
कोल्हापुरात सचिन तोडकर हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यांच्या प्रभागातील कार्यालय येथे जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला आहे.
विभागातील भारतीय जनता पार्टी च्या कार्यकत्या नी एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतिषबाजी व “राणे साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है” अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला, व साखर पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.
यावेळी भाजपचे महिला आणी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.