रणजितसिंह पाटील यांच्या गोकुळ मधील निवडीने भुदरगड मध्ये राष्ट्रवादीत चैतन्य..

भुदरगड प्रतिनिधी / प्रकाश पाटील
भुदरगड तालुक्यात राष्ट्रवादीचे जिल्हा नेते माजी आमदार के. पी .पाटील यांना मानणारा मोठा गट आहे मात्र प्रत्येक वेळी पदे मिळवुन गटाशी प्रतारणा करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या सुद्धा या गटात अधिक आहे. सहकारात जिल्हाच नव्हे तर राज्यपातळीवर केपी पॅटर्न परिचित झाला आहे हुतात्मा सूतगिरणी, बिद्री सहकारी कारखाना, जिल्हा मध्यवर्ती बँक येथील उठावदार कामगिरीमुळे राज्य नेतृत्वाने माजी आम. के. पी. पाटील यांना कोल्हापूर बाजार समितीत मुख्य प्रशासक म्हणून नियुक्ती केली आणि ती निवड सार्थ ठरवत अडचणीत असलेली बाजार समिती त्यांनी रुळावर आणण्याचे काम केले हे सर्वपरिचित आहे अशाच वेळी वर्ष दोन वर्ष आमचं ठरलंय बोलत जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील व राष्ट्रवादीचे जिल्हा नेते ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ खासदार संजय मंडलिक यांनी गोकुळच्या निवडणुकीचे बिगुल वाजवले मात्र भुदरगड तालुक्यात राष्ट्रवादीतील गोकुळची उमेदवारी ठरवण्यापूर्वी काहीजणांनी गटाशी फारकत घेण्याची तयारी चालवली .हे राष्ट्रवादीतील गावच्या कार्यकर्त्यांना रुचले नाही ज्यांना पदे दिली तेच सगळे साथ सोडतात तर त्यांना धडा शिकवा असा सूर सुरुवातीपासून सुरू झाला .अशा अडचणीच्या वेळी दुसऱ्यांना बळी न देता माजी आमदार के. पी. पाटील यांनी आपणच हे आव्हान स्वीकारले आणि त्यातून मग रणजितसिंह पाटील यांची उमेदवारी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी ठरवली. पण त्या अगोदरच राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील गोकुळचे एकमेव प्रतिनिधी विद्यमान संचालक विलास कांबळे यांनी गटाची साथ सोडली विरोधी आघाडीतून उमेदवारी मिळवली हे राष्ट्रवादी कार्यकर्त्याला रुचले नाही व लगेचच राष्ट्रवादीचे बिद्री कारखाना संचालक धनाजीराव देसाई यांनी गोकुळच्या उमेदवारीसाठी गटाची साथ सोडली. यामुळे तर राष्ट्रवादीतील गोकुळ ठराव धारक एकसंध झाले आणि उमेदवार रणजितसिंह पाटील यांनी के. डी. सी .सी. च्या माध्यमातून केलेली कामे लोकसंपर्क त्यांचे कामे आला त्याचबरोबर शैक्षणिक समूहातून त्यांनी केलेली उठावदार कामगिरी त्यांना वेळेला उपयोगी पडली. त्याच बरोबर दहा वर्षापूर्वी त्यांचा गोकुळ मधील पराभवाचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादीतील लहानांपासून तालुक्यातील सर्व जेष्ठ नेत्यांनी प्रामाणिकपणे साथ-संगत करत जिल्हाभर जमेल तशी स्वतः संपर्क करून यंत्रणा उभी केली आणि हेच अधिक फायद्याचे ठरले हे निवडणूक निकालावरून सिद्ध होते.
गद्दारांना धडा शिकवायचा माजी आमदार के. पी. पाटील यांना अडचणीत साथ करायची हे भावना तालुका भर पोचली मग ठराव असो किंवा नसो कार्यकर्ते स्वतः लढणेस तयार झाले. आणि मीच उमेदवार ही भावना तयार झाली आणि आमदारकीच्या पराभवाने खचलेला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता पुन्हा चार्ज झाला आणि याच बळावर विजयश्री खेचून आणली. अर्थातच याचबरोबर जिल्हा नेते यांची यंत्रणा तालुक्यात सोबतीला असलेल्या आमदार गटाची प्रामाणिक साथ याही गोष्टी जमेच्या ठरल्या.
मात्र काही असले तरी रणजितसिंह पाटील यांच्या गोकुळ मधील प्रवेशाने भुदरगड राष्ट्रवादीला एक मोठे सत्ताकेंद्र मिळाले आहे. त्यामध्येही संस्था महत्त्वाची हा के. पी. पॅटर्न राबविताना गोकुळच्या सत्तेचा अधिक फायदा गट वाढवण्यासाठी नूतन संचालक करणार ही भावना गावोगावच्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत पोचले मुळे माजी आमदार के. पी. पाटील गटात एक नव चैतन्य पसरले आहे.
या जोरावर भुदरगड तालुका राष्ट्रवादीचा कार्यकर्ता पुन्हा एकदा चार्ज झाला आहे. या विजयश्रीमुळे त्यांची आगामी निवडणुकींना सामोरे जायची चांगली मानसिक तयारी गाव पातळीवर झाली आहे. त्यामुळे नूतन संचालक रणजितसिंह पाटील यांच्या गोकुळ मधील निवडीने भुदरगड तालुका राष्ट्रवादी मध्ये एक नवचैतन्य पसरले आहे हे निश्चित