अनंतशांती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या राधानगरी – भुदरगड अध्यक्षपदी सुभाष चौगले

तरसंबळे प्रतिनिधी :शाम चौगले
अनंतशांती बहुउद्देशिय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या राधानगरी – भुदरगड तालुका विभाग अध्यक्षपदी सुभाष चौगले (कुडूत्री ता.राधानगरी) यांची नुकतीच निवड करण्यात आली.निवडीचे पत्र नुकतेच संस्थापक अध्यक्ष भगवान गुरव यांनी सुपूर्द केले.
अनंतशांती गेली १३ वर्षे राज्यभर विविध उपक्रम राबवत असते.तर अनेक होतकरू समाजासाठी झटणाऱ्या लोकांना पुरस्कारातून कौतुकाची थाप पाठीवर देत असते.अशाच नावारूपास आलेल्या संस्थेने पत्रकार सुभाष चौगले यांची निवड करून या संस्थेची सेवा करण्याची संधी त्यांना दिली आहे.
गेल्या २० वर्षातील सामाजिक,शैक्षणिक,पत्रकारिता, साहित्यिक,अशा झुंजार व अष्टपैलू कार्याची दखल घेऊन सुभाष चौगले यांची निवड केली असल्याचे सांगितले.
ही निवड गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आली आहे.या कामी संस्थापक अध्यक्ष भगवान गुरव,अध्यक्षा डॉ.माधुरी खोत,सचिव अरुणा पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
निवडीचे पत्र नुकतेच देण्यात आले असून या वेळी सुभाष चौगले यांचा फेटा,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.सत्कार प्रसंगी संस्थापक अध्यक्ष भगवान गुरव,संतोष संकपाळ,कृष्णा मारुती चौगले,श्रीपती गोविंद डवर,आबाजी चौगले, प्रतीराज घुगरे,आदी उपस्थित होते.