ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कोल्हापुरात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची दमदार एंट्री

कोल्हापूर : गौरी पाटील
कोल्हापूरात विजेच्या कडकडासह अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली.गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड उकाडा जाणवत होता, मात्र रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. आज रविवारी रात्री आठच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. जवळपास अर्धा तास शहरातील विविध ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सुरू होता.
हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार आज कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. अचानक आलेल्या वादळी पावसाने अनेकांचे नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड उकाडा जाणवत होता, मात्र रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. आज रविवारी रात्री आठच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. जवळपास अर्धा तास शहरातील विविध ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सुरू होता.