निराधार महिलांचा आत्मसन्मान जपणे आमचे कर्तव्यच : राजे समरजीतसिंह घाटगे ; विधवांच्या कायमस्वरूपी पेन्शनसाठी यशस्वी पाठपुरावा केल्याबद्दल राजे समरजीतसिंह घाटगे यांचे मानले आभार

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
समाजातील विधवा, परितक्त्या,अपंग अशा निराधार महिलांचा आत्मसन्मान वाढण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे.त्यामुळे आशा निराधार महिलांचा आत्मसन्मान जपणे हे आमचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांनी केले.
संजय गांधी निराधार योजनेतून कायमस्वरूपी पेन्शन मंजूर करण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केल्याबद्दल राजे समरजीतसिंह घाटगे यांचा सत्कार लाभार्थी महीलांच्या वतीने करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.स्वागत, प्रास्ताविक अरूण गुरव यांनी केले.
या अगोदर विधवा महिलांना त्यांच्या मुलाचे वय 25 वर्षाच्या वर असेल तर संजय गांधी निराधार योजनेचा त्यांना लाभ मिळत नव्हता.मात्र राज्य सरकारने या निर्णयामध्ये तत्काळ बदल करत नव्या अध्यादेशाद्वारे विधवा महिलांना कायमस्वरूपी पेन्शनचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे.यासाठी राजे समरजित सिंह घाटगे यांनी पाठपुरावा केला होता.
सत्कारानंतर प्रतिक्रिया देताना श्री घाटगे म्हणाले,अडीच वर्षाच्या कार्यकाळात मागील सरकारने निराधार महिलांचे प्रश्न सोडवण्याबाबत केवळ आश्वासनेच दिली.मात्र आमचे सरकार सत्तेवर येताच संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांची पेन्शन 1000 वरून 1500 रुपये करण्यात आली. या योजनेपासून वंचित असलेल्या अनेक निराधार महिलांचे पेन्शनबाबत अर्ज येत आहेत. अशा वंचित महिलांनाही तत्काळ या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे श्री.घाटगे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी बयाबाई मारूती कांबळे ( क.सांगाव), मालूबाई दिलीप कांबळे ( क.सांगाव), अर्चना सचिन वडींगेकर (कागल), दिपाली सचिन म्हैत्रे (कागल), राजश्री संजय शेलार(कागल), उमाश्री प्रवीण गवंडी(कागल), राजश्री तानाजी शिंदे (कागल) यांच्यासह लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
राजेंमुळेच मिळाले,जगण्याला बळ ….
संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी महिला जयश्री संदीप कवठे यांनी विधवा महिलांना कायमस्वरूपी पेन्शन मंजूरीसाठी केलेल्या यशस्वी पाठपुराव्याबद्दल राजेंचे कौतुक केले.त्यांच्यामुळेच आम्हाला आर्थिकदृष्ट्या बळ मिळाले आहे.त्यांचे हे ऋण सर्वच विधवा भगिनी कायमस्वरूपी स्मरणात ठेवतील असे सांगताना त्यांना गहिवरून आले.