सोन्याच्या चांदीच्या भावात पुन्हा घसरण

टीम ऑनलाईन :
सोन्याच्या भावात 0.81 टक्क्यांनी घसरण झाली असून हा भाव 44,517 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये एप्रिल महिन्याच्या डिलिव्हरी असलेल्या सोन्याच्या भावात 362 रुपये म्हणजेच 0.81 टक्क्यांनी घसरण होत 44,517 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. यामध्ये 11,004 लॉटसाठी व्यापार झाला.
तर चांदीच्या वायदा भावात देखील 776 रुपयांनी घसरण होत 66,769 रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये चांदीच्या मे महिन्यातील डिलिव्हरीच्या चांदीच्या भावात 776 रुपये म्हणजेच 1.15 टक्क्यांनी वाढीसह 66,769 रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला.
सोन्याच्या भावात घसरण होत 1,707 डॉलर प्रति औंस इतका झाला.चांदीच्या भावात घसरण होत 25.67 डॉलर प्रति औंस इतका झाला .1.9 ट्रिलियन डॉलरच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे, म्हणून अपेक्षा आहे की, सरकार याला लवकरच मान्यता सुद्दा देईल. त्यानंतर सोन्याच्या भावात वाढ होऊ शकते.