लाल बावटा शालेय पोषन आहार कामगार संघंटनेतर्फ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

सावरवाडी प्रतिनिधी :
जिल्ह्यातील शालेय पोषन आहार कामगारांना गेल्या पाच महिन्यापासुन थकित मानधन त्वरीत मिळावे . सन २०१७ व १८ मधील थकित बीले आदा करावीत यासह इतर मागण्यांचे लेखी निवेदन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चौहाण यांना देण्यात आले .
संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड भगवान पाटील यांच्या नेतृत्वाखाली एका व्यापक शिष्टमंडळातर्फ हे लेखी निवेदन देण्यात आले शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रश्नांची दिवाळीपूर्वी सोडवणूक करण्यात येईल असे आश्वासन सीओ यांनी दिले
यावेळी झालेल्या चर्चत प्राथमिक शिक्षणाधिकारी ऊबाळे . संजय सिंह चौहान . जिल्हाध्यक्ष कॉम्रेड भगवान पाटील संघंटनेचे कार्याध्यक्ष प्रा.आर एन पाटील सर.यानी नंदंकुमार नारवेकर. बळवंतं दाभोळे .तुकाराम खापरे. तानाजी पाटील.दीनकर पाटील.विनायक जाधव.रावजी पाटील .राम नलवडे.सविता मानगावकर आदि उपस्थितीत होते