ताज्या बातम्यामहाराष्ट्र
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात जाणाऱ्या एसटी गाड्या केल्या बंद

कोल्हापूर प्रतिनिधी :
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर एसटी बसवर होणाऱ्या दगडफेकीमुळे कर्नाटकात जाणाऱ्या एसटी गाड्याच बंद करण्याचा निर्णय एस. टी महामंडळाने शनिवारी घेतला. त्यानुसार दुपारपासून कर्नाटकात जाणाऱ्या एसटी गाड्या बंद झाल्या. दिवसभरात कोल्हापूर-बेळगाव मार्गावर २६ गाड्या धावतात. कागलपर्यंत कोल्हापूर आगाऱाच्या बसेस धावत असल्याची माहिती विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली.कर्नाटकातील एकाने महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग महामंडळाच्या येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात फलाटावर लावलेल्या कोल्हापूर-स्वारगेट(पुणे) बसवर दगडफेक केली. त्यात बसचे पंचवीस हजारांचे नुकसान झाले. याप्रकरणी एकनाथ सोमाण्णा हलगीकर यास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.