ताज्या बातम्या

ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

गडहिंग्लज प्रतिनिधी : सोहेल मकानदार

राज्याचे ग्रामविकास व कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून करण्याचा निर्णय गडहिंग्लज शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला . बुधवार दि . २१ एप्रिल रोजी मंत्री हसन मुश्रीफ यांचा ६७ वा वाढदिवस आहे . या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली . यावेळी बुधवार दि . २१ रोजी गडहिंग्लज मधील कडगाव रोड येतील पक्षाच्या कार्यालयात सकाळी ९ वाजता रक्तदान शिबीराचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला . तसेच मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्याचे ठरले.

या बैठकीस किरण कदम, वसंतराव यमगेकर, रमजान अत्तार, रश्मिराज देसाई, शर्मिली पोतदार, स्वप्नील गुरव, गुंडू पाटील , रफिक पटेल, महेश गाडवी, आण्णासाहेब देवगोंडा, सुरेश कोळकी, अमर मांगले, शारदा आजरी, तौफिक मुल्ला यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks