ताज्या बातम्याराजकीय
कागल तालुक्यातील सहा तलाव भरले
मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मृग नक्षत्राच्या दमदार पावसामुळे कागल तालुक्यातील २१ पाझर तलावांपैकी सहा तलाव ओसंडले आहेत. सहा तलावात ७० टक्केच्या वर पाणीसाठा असून सहा तलावात ५० टक्केच्या वर पाणीसाठा झाला आहे, तर तीन तलावात २५ टक्केपेक्षा कमी पाणीसाठा असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभाग कागल उपविभागचे शाखा अभियंता एम. बी. कोळी यांनी दिली.