मुरगूड येथील श्री. गणेश नागरी सह .पतसंस्थेला २ कोटी २७ लाखावर निव्वळ नफा – सभापती सोमनाथ यरनाळकर

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड ता . कागल येथील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या श्री . गणेश नागरी सहकारी पतसंस्थेला २०२४-२५ या आर्थिक वर्षात २ कोटी २७ लाख रुपये इतका निव्वळ नफा झाल्याची व १०० कोटी ठेवीचा टप्पा पार केल्याची माहिती सभापती सोमनाथ यरनाळकर यानीं दिली.
यरनाळकर पुढे म्हणाले, आर्थिक वर्षात एकूण ६१९ कोटी इतका व्यवसाय झालेला आहे . संस्थेने अल्पावधीतच गरुड भरारी घेऊन मुरगूड पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात एक आदर्श निर्माण केला आहे . अशीच संस्थेची भरभराटी होईल अशी ग्वाही त्यानी यावेळी दिली.
संस्थेची सांपत्तिक स्थिती भागभांडवल ४४ लाख८३ हजार , राखीव निधी व इतर निधी ११ कोटी ३९ लाख , ठेवी ११६ कोटी १० लाख , कर्जे ९१ कोटी ९३ लाख, गुंतवणूक ४२ कोटी ४७ लाख, पैकी सोनेतारण कर्ज ३४ कोटी २७ लाख , खेळते भांडवल १७१ कोटी ९ लाख एकूण व्यवहार ६१९ कोटी ६२ लाख , सभासदानां १५ % डिव्हिडंट आणि संस्थेला ऑडीट वर्ग “अ”( मार्च २०२४ ) मिळाल्याची माहिती त्यांनी दिली . त्याचबरोबर मुख्यशाखेसह केनवडे शाखा , बिद्री शाखा , गारगोटी शाखा कार्यरत असून करवीर तालूक्यातील नंदगाव आणि राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथे नवीन शाखेची मंजुरी मिळाली असून यामुळे दैदित्यमान यशामध्ये आणखीन भर पडल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले .
स्व . खासदार सदाशिवराव मंडलिक साहेब यांच्या आशिर्वादाने तसेच माजी खासदार संजयदादा मंडलिक यांच्या मार्गदर्शनामुळे संस्था प्रगतीपथाकडे वाटचाल करीत आहे.
यावेळी उपसभापती राजाराम कुडवे , संचालक उदयकुमार शहा , एकनाथ पोतदार , आनंदराव देवळे , सुखदेव येरुडकर, मारूती पाटील , प्रकाश हावळ , आनंदा जालीमसर , दत्तात्रय रा . कांबळे , संचालिक सौ . रुपाली शहा , सौ . रेखा भोसले , कार्यकारी संचालक राहुल शिंदे ,शाखाधिकारी चिदंबर एकल सेवक वर्ग उपस्थित होते .