ताज्या बातम्यामहाराष्ट्र
चंदगड : हेरे येथील सख्या बहिणींची पोलीस पदी निवड

चंदगड प्रतिनिधी/पुंडलिक सुतार
हेरे ता. चंदगड येथील सख्ख्या बहिणी कु.श्रीवाणी हणमंत पाटकर हिची मुंबई पोलीस पदी व कु.मानसी हणमंत पाटकर हिची रत्नागिरी पोलीस पदी निवड झाल्याने तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी मैदानी व लेखी परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करून त्यांची पोलीस पदी निवड झाली.
श्रीवाणी हणमंत पाटकर हीचे एम.कॉम पर्यंत व मानसी हणमंत पाटकर हिचे बी. कॉम पर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांना यासाठी वडील हणमंत पाटकर ,आई हर्षदा पाटकर ,बहिण सयोनी पाटकर , कुडव व पाटकर परिवार आणि पेजर अकॅडमी कोल्हापूर यांचे योगदान लाभले .