ताज्या बातम्यामहाराष्ट्र
आजरा : रस्ता फोडणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करावी

आजरा प्रतिनिधी/पुंडलीक सुतार
कोळिंद्रे ते बटकनंगले या रस्त्यावर दोन ठिकाणी पाईपलाईन पुरण्यासाठी रस्ता फोडून पाईपलाईन नेण्यात आली असून फोडलेल्या रस्त्यावर ओबडधोबड माती ओढण्यात आली असून वाहनधारकांना या वरून वाहने हाकत असताना दमछाक होते आहे सम्बधित विभागाने या व्यक्तींचा शोध घेऊन सदर रस्ते सरळ करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी होते आहे.