सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या शिवानी कुलकर्णीला आंतर विद्यापीठ स्पर्धेत कांस्यपदक

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
अखिल भारतीय अंतर विद्यापीठ क्रॉसकंट्री ( महिला) स्पर्धा नुकत्याच मंगलूर (मोडबिद्रि) येथे पार पडल्या. सदर स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या महिला क्रॉस कंट्री संघाने कास्य पदक पटकाविले. या संघातून सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाची खेळाडू कु. शिवानी कुलकर्णी हिने प्रतिनिधित्व केले होते.
शिवानी कुलकर्णीचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार यांच्या हस्ते बुके व चेक देऊन करण्यात आला. या वेळी डॉ. शिवाजी पोवार, डॉ. ए जी मगदूम, डॉ. माणिक पाटील, दिलीपराव कांबळे, प्रा. पी. आर. आर. फराकटे, राजू मंडलिक, सुमीत जाधव हे उपस्थित होते.
या खेळाडूला डॉ. शिवाजी पोवार, रामदास फराकटे, संभाजी कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले तर संस्था सेक्रेटरी खासदार प्राध्यापक संजय मंडलिक, कार्याध्यक्ष अँड. विरेंद्र मंडलिक, प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार, कार्यवाह अण्णासाहेब थोरवत यांचे प्रोत्साहन मिळाले