कोविड च्या वाढत्या पाश्वभूमीवर कागलच्या ग्रामीण रुग्णालयास राजे समरजितसिंह घाटगे यांची भेट.

कागल प्रतिनिधी.
मुंबई,पुणे या मोठ्या शहरासह अनेक जिल्ह्यात कोविड रुग्ण वाढत आहेत.
सरकारने आज दिनांक 14 रात्री 8 पासून 30 एप्रिल 2021 पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात रुग्णासंख्या कमी असली तरी ती वाढू नये याची दक्षता घेतलीच पाहिजे म्हणूनच शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी आज कागल च्या
ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन कागल तालुक्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा, औषध पुरवठा,व आरोग्य सेवेचा आढावा घेतला. कागल ग्रामीण रुग्णालयामार्फत कोविड लसीकरण चे काम उत्कृष्ट चालू असून या लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी यावेळी दिली.
तसेच महिलांच्या लसीकरणाचे साठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
नुकतीच कोल्हापूरसाठी एक लाख लस उपलब्ध झाली आहे. या मोहिमेचा त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून विस्तृत आढावा घेतला.
यावेळी ते म्हणाले,महाराष्ट्रभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्यापेक्षा जवळपास तिप्पट गतीने रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामानाने कोल्हापूरमध्ये रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. तरी येणाऱ्या दिवसांमध्ये रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. तेव्हा सर्वांनी काळजी घ्या. कोरोनाचे नियम पाळा. सर्व पात्र व्यक्तींनी लसीकरण करून घ्या. कोरोना प्रतिबंधक लस सर्वच नागरिकांनी घेणे आवश्यक आहे. त्याचे कोणतेही साइड इफेक्ट नाहीत. केवळ पहिलाच डोस नव्हे तर पुढचे डोसही घेऊन नागरिकांनी सामाजिक कर्तव्य पार पाडावे. शाहू ग्रुप मार्फतही कोरोना प्रतिबंधक लसीचा वेग वाढवण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करू. त्यासाठी शाहू साखर कारखान्या मार्फत चालवण्यात येत असलेल्या कोविड सेंटर वर लसीकरण कॅम्प घेण्याची तयारीही त्यांनी दर्शवली.
यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ हर्षला वेदक, वैद्यकीय अधिक्षक डॉ सुनिता पाटील वैद्यकीय अधिकारी डॉ रविंद्र बल्लूरगी, डॉ साधना मदने डॉ महेंद्र पाटील,जे. एम. खोत आदी उपस्थित होते.