ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कन्नड रक्षण वेदिकेच्या आंदोलनाला शिवसेनेचे चोख प्रत्युत्तर ; कोल्हापूरात कर्नाटकची बस वाहतूक रोखली
कोल्हापूर प्रतिनिधी :
कन्नड रक्षण वेदिकेच्या आंदोलनाला शिवसेनेने चोख प्रत्युत्तर देत कोल्हापुरातील कर्नाटकची बस वाहतूक शिवसेनेने रोखली आहे.
कन्नड संघटनेविरोधात आता शिवसेना आक्रमक झाली असून कर्नाटक राज्याची बससेवाच शिवसेनेने बंद केली आहे. कोल्हापूर येथील बसस्थानकावर शिवसेनेने हे आंदोलन केले असून कर्नाटकच्या काही बसला काळेही फासण्यात आले आहे. बेळगावमध्ये मराठी फलकांना काळे फासल्यानंतर तसेच कन्नडिगांची सुरू असलेल्या मुजोरीच्या निषेधार्थ शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये हे आंदोलन करण्यात आले.