कोल्हापूर मध्ये शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा

नंदगाव प्रतिनीधी : सचिन चौगले
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त व कोल्हापूर येथे हिंदी भारतीय जनरल कामगार सेना व महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष निलेश उर्फ आप्पा पराडकर यांच्या वाढदिवसानिमित्त खासबाग येथील संपर्क कार्यालयात आला यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे व मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून भारतीय कामगार सेनेचे संपर्क प्रमुख विनायक साळोंखे यांच्या हस्ते केक कापून व मिठाई वाटून साजरा करण्यात आला. यावेळी माजी आमदार सुरेश साळोंखे शिवाजी जाधव शहराध्यक्ष राजू सांगावकर जिल्हाध्यक्ष व शहर प्रमुख महादेव कुकडे यांच्या हस्ते शिव भोजन थाळी चे वाटप करण्यात आले तसेच यावेळी अजय पोवार, सुरेश शिंदे, वायकर संजय शिंदे, महेंद्र साळोंखे, सुरज साळोंखे, महाविर कटके ,सिकंदर शेख, अवधूत साळुंखे साळोंखे ,सुरेश पोवार हे ही उपस्थित होते