ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

शरद पवार आणि अमित शहांची गुजरातमधील फार्म हाऊसवर भेट ?

मुंबई प्रतिनिधी :

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अनेक भुकंपाचे धक्के बसत असतानाच सत्ताधारी शिवसेनेची चिंता वाढविणारी एक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची गुजरातमधील एका फार्म हाऊसवर भेट घेतल्याचे वृत्त एका गुजराती दैनिकात प्रसिद्ध झाले आहे. मात्र,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मात्र प्रसारमाध्यमांशी बोलताना हे वृत्त फेटाळून लावले आहे.

गुजरातमधील एका दैनिकात दिलेल्या वृत्तात म्हटले आहे, ‘अहमदाबादमधील एका फार्महाऊसवर २६ मार्च रोजी रात्री साडेनऊ वाजता प्रफुल्ल पटेल व भाजपच्या बड्या उद्योगपतींची भेट झाली. या भेटीवेळी शरद पवार देखील उपस्थित होते. शरद पवार, प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत गुप्त बैठक झाली. या भेटीसाठी पवार खासगी विमानाने गेल्याचेही वृत्तात म्हटले आहे.

या वृत्ताबाबत खुलासा करताना नवाब मलिक म्‍हणाले, ‘शरद पवार आणि अमित शहा यांच्यात भेट झालेली नाही. प्रफुल्ल पटेल व शरद पवार अहमदाबादहून थेट मुंबईला आले आहेत. त्यांच्यात भेटच झाली नाही. अशा बातम्या प्रसिद्ध करणे हे एक षडयंत्र आहे, असा दावाही त्‍यांनी केला.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks