ताज्या बातम्या

मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्ट व छत्रपती राजर्षी शाहू बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्थे मार्फत शाहू पुण्यतिथी साजरी

नंदगाव प्रतिनीधी :

राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुण्यतिथी निमित्त मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्ट व छत्रपती राजर्षी शाहू बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्टचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व छत्रपती राजर्षी शाहू बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष मा. मोहम्मद यासीन शेख व मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्टचे वरिष्ठ उपाध्यक्ष मा. विजय पाटील यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या फोटो पूजन केले. याप्रसंगी सर्वांनी सर्व धर्म समभाव आचरणात आणण्याची शपथ घेतली. तसेच समाजातील दीनदलित , दुबळ्या लोकांना मदत करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प केला. शाहू महाराजांनी घालून दिलेल्या नीतिमूल्यांचा वारसा जपण्याचं काम छत्रपती राजर्षी शाहू बहुउद्देशीय संस्था करत आहे. समाजातील जातीय विषमता दूर करून गोरगरिबांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम ही संस्था करत आहे. समाजातील कोणत्याही व्यक्तीवर होणारे अन्यायाला वाचा फोडण्याचे व अन्याय दूर करण्याचे काम मानव अधिकार न्याय सुरक्षा ट्रस्ट व छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक संस्था करत आहे. याप्रसंगी बोलताना संस्थेचे अध्यक्ष माननीय महंमद यासीन शेख यांनी महाराजांचा आदर्श घेऊन त्यांच्या वाटेवरून चालण्याचा संकल्प केला आहे. या कार्यक्रमास मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्ट चे जिल्हाध्यक्ष व छत्रपती राजर्षी शाहू बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्थेचे सचिव मा. संजय शिंदे मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्टचे जिल्हा उपाध्यक्ष मा. महेश नंदे व सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख उपस्थित होते. हा कार्यक्रम लॉकडाऊन चे सर्व नियम पाळून व अगदी मोजकया च लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks