” शाहू” ने पार केला इतिहासात उच्चांकी १० लाख मे. टन ऊस गाळपाचा टप्पा

कागल प्रतिनिधी.
येथील श्री.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासातील उच्चांकी १० लाख मे. टन ऊस गाळपाचा ऐतिहासिक टप्पा पार केला. असे शाहूच्या प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हंटले आहे, चालू हंगामाच्या सुरुवातीस सर्वच साखर कारखानदारी समोर कोरोना पाश्वभूमी होती.तोडणी मजूरांच्या अपुऱ्या उपलब्धतेमुळे अनेक साखर कारखान्यांन्या समोर गाळप क्षमतेत इतका ऊस पुरवठा होईल नाही याबद्दल शासंकता होती. मात्र शाहू प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे प्रतिदिनी ७५०० मे.टन गाळप क्षमता असलेल्या या कारखान्याने जवळपास गाळप क्षमते इतक्या सरासरीने गाळप करून हा यशस्वी टप्पा पूर्ण केला.
व्यवस्थापनाने या हंगामासाठी १० लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले होते.या उद्दिष्टपूर्तीसह ऐतिहासिक कामगिरीचा टप्पा पार करून कारखान्याने 10 लाख गळीताचा टप्पा व उद्दिष्ट असे दुहेरी यश संपादन केले आहे.त्यामुळे सभासद कर्मचारी पुरवठादार हितचिंतक यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे.
कारखान्याचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी केवळ ३३ हजार मे. टन ऊसाच्या उपलब्धतेवर १९८० साली पहिला गळीत हंगाम घेतला होता. त्यावेळी १२५० मे.टन प्रतिदिन गाळप क्षमता असलेल्या या कारखान्याने ७३ हजार ५१३ मे.टन इतक्या ऊसाचे गाळप केले होते.त्यानंतर यावर्षीच्या ४१ व्या गळीत हंगामामध्ये १० लाख मे.टन ऊसाच्या गाळपाचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. हा टप्पा सर्वांनाच अभिमानास्पद आहे .
या यशावर भाष्य करताना कारखान्याचे चेअरमन समरजितसिंह घाटगे म्हणाले,आमचे आराध्य दैवत राजर्षि छत्रपती शाहू महाराज, यांचे आशीर्वाद ,
स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी कारखाना चालविताना घालून दिलेली मार्गदर्शक तत्वे सभासद, शेतकरी ,पुरवठादार,तोडणी वाहतूक कंत्राटदार व हितचिंतक यांचे सहकार्य, अधिकारी-कर्मचारी यांचे कष्ट व व्यवस्थापनाचे योग्य नियोजन यामुळेच हा ऐतिहासिक टप्पा आम्ही पार करू शकलो. या सर्वाप्रति मी कृतज्ञता व्यक्त करतो