ताज्या बातम्यामहाराष्ट्र
शाहीर मारुती केसरकर यांचा शाहिरी गीतांचा कार्यक्रम उत्साहात

चंदगड प्रतिनिधी : पुंडलीक सुतार
राजगोळी बुद्रुक ता चंदगड येथे शाहीर मारुती केसरकर व सहकारी महागाव यांचा शाहिरी गीतांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला.प.पू. ह.भ.प.श्री गुरुमाऊली सावित्राबाई (आक्का) यांच्या 45 व्या पुण्यसमरण दिनानिमित्त सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यासाठी शाहीर केसरकर याना कोरस साथ अशोक केसरकर,मारुती बुगडे,विजय गोंधळी यांनी दिली तर ढोलकी साथ बाळू कुराडे यांनी दिली तर हार्मोनियमसाथ मारुती पाटोळे यांनी दिली .