ताज्या बातम्यासामाजिक

सेवाव्रत प्रतिष्ठान, हिंदुत्ववादी संघटना यांनी अहोरात्र कार्यरत राहून उचलला अन्नदानाचा विडा

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे

आई अंबाबाईचा वरदहस्त लाभलेलं आमचं कोल्हापूर. पंचगंगेच्या पाण्यावर पोसलेल्या आमच्या अनेक पिढ्या, आम्हाला माणूसकीच दर्शन घडवण्यापासून वंचित ठेवणार नाहीत. आयुष्यात अनेक कठीण प्रसंग येतात पण आम्ही मात्र अशावेळी ऐकमेकांचा आधार जगतो. दुसऱ्याचा आधार बनत असताना आपल्या ताटातील मीठ-भाकरही वाटून खाण्याचा आमचा प्रयत्न असतो. हाच कोल्हापूरकरांचा स्वभाव साऱ्या जगाला भावतो. 
   

आज संपुर्ण जगावर परत एकदा कोरोनाचे महाभयंकर संकट उभे आहे. २०२० मधुन नुकतेच सावरतोय, तोपर्यंत २०२१ मध्ये कोरोनाची दुसरी लाट जगावर पुन्हा एकदा पसरली आहे. परत एकदा लाॅकडाऊन मुळे रस्ते  सुनसान झाले आहेत. व्यवसाय बंद पडले आहेत. लोकांसमोर स्वतःच तसेच कुटुंबाचं पोट भरण्याचा मोठा प्रश्‍न उभा ठाकला आहे. नोकरी – व्यवसाय ठप्प झाल्याने साठवून ठेवलेली पुंजी संपून गेली आहे. अशा अवस्थेत लोक जगणार कसे असा प्रश्न उभा आहे. कृपया शासनाने याची दखल घ्यावी.
    

“तुम्ही काळजी घ्या आम्ही जबाबदारी घेवू” या ध्येयातून सेवाव्रत प्रतिष्ठान आणि हिंदुत्ववादी संघटनेतर्फे अहोरात्र कार्यरत राहून या कार्यकर्त्यांनी अन्नदानाचा विडा उचलला आहे.

कोणत्याही शासकीय मदतीशिवाय दररोज सेवाव्रत प्रतिष्ठान, हिंदुत्ववादी संघटना आणि दानशूर व्यक्तींच्या वतीने गेल्या वीस – पंचवीस दिवसांपासून अन्नदानाचे मोलाचे कार्य आजवर अखंडपणे चालू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून तसेच कोकणातून आणि आसपासच्या जिल्ह्यातून आलेल्या जवळ-जवळ दोनशे लोकांना या अनदानाचा लाभ मिळतो. सेवा हा एकच ध्यास मनात घेऊन कोविड हॉस्पिटल मधील ऍडमिट पेशंटच्या नातेवाईकांना मोफत संपुर्ण जेवण देण्याची ही योजना आहे. यापाठीमागे एकच ध्येय आहे की आई अंबाबाईचे दारात कोणी दु:खी व भुकेलेला राहू नये यासाठी हा एक छोटासा प्रयत्न. या उपक्रमास मदत करणारे कोरोणा योद्धे

स्वयंपाक जबाबदारी—- मनीष शहा. संजय पाटील (माळी). मयूर जाधव. सागर साळोखे. कृष्णा साळोखे. संदीप साळोखे. प्रवीण पवार. विजय मागुरे. सुवास शिंदे. पंकज पवार. मोहन कोळी. यश साळुंखे. मुन्ना रजपूत. भाऊ महाराज. महेश लाड. संजय चव्हाण.अनिकेत पोवार. योगेश डवंग. जोतीरादेत्ये देशमुख ओम जाधव

वितरण व्यवस्था —- सनी पेणकर.विनायक अवळे, अवधूत भाटे.प्रशांत कागले, ऋषिकेश कोकितकर. नितेश कोकितकर.संदीप दोशी, सचिन दोशी. शुभम जाधव. संग्राम मोहिते. रमेश भोपळे. शुभम नाईक. सुरज भोसले. सागर सोनार. सुधीर सूर्यवंशी. मोहन देवाळकर. प्रीतम चव्हाण. निरंजन दुर्गुळे .

आजचा सेवेचा 38 वा दिवस

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks