ताज्या बातम्यामहाराष्ट्र

पशुसंवर्धन विभागाशी निगडीत सेवा, उपभोग्य बाबी प्रशासनाव्दारे निर्धारीत केलेल्या कालावधीत उपलब्ध

कोल्हापूर : रोहन भिऊंगडे

शासनाद्वारे तसेच स्थानिक प्रशासनाव्दारे कोव्हिड-19 प्रसार खंडीत करणे अभियानातंर्गत निर्गमित केलेल्या निर्देशांचे पालन करणे अवश्यक आहे. या सेवा उपलब्ध करीत असताना संबंधितांनी पशुसंवर्धन विभागाशी निगडीत असलेल्या सेवा तसेच उपभोग्य बाबी या स्थानिक प्रशासनाव्दारे निर्धारीत केलेल्या कालावधीत उपलब्ध असल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय. ए. पठाण यांनी दिली.
यामध्ये पशुसंवर्धन विभागाशी निगडीत खालील बाबी अंतर्भूत आहेत.
शासन आदेशानुसार अत्यावश्यक सेवांमध्ये दूध व दुग्धजन्य पदार्थ (डेअरी) आणि फुड शॉपचा समावेश करण्यात आला आहे. तसेच चिकन, कोंबड्या, मटण, अंडी, मासे दुकानांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. यामध्ये जनावरांसाठी आवश्यक असणारे पशु/कुक्कुट खाद्य, चारा इ.चा समावेश आहे.
स्थानिक कार्यालयाच्या मान्सून पूर्व उपक्रमांचा समावेश अत्यावश्यक सेवांमध्ये करण्यात आला असून यामध्ये पशुसंवर्धन विभागामार्फत नमुद काळात हाती घ्यावयाच्या लसीकरण कार्यक्रमांचा अंतर्भाव होतो. स्थानिक कार्यालयामार्फत जनसामान्यांना पुरविण्यात येणाऱ्या सेवा समाविष्ट आहेत. यात पशुसंवर्धन विभागाच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयांचा समावेश होतो. माल वाहतूक समाविष्ट आहे.
तसेच सर्व प्रकारच्या कार्गो सेवांचा समावेश अत्यावश्यक सेवांमध्ये करण्यात आला आहे. यामध्ये आवश्यक वस्तू व सेवांकरिता वाहतूक व पुरवठा श्रृखंला अबाधित ठेवण्यात आली आहे. यामध्ये दूध व दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मांस, मासे व जनावरांचा चारा या वस्तू व त्यांच्यावर प्रक्रिया करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची वाहतूक करणे व त्यांच्या साठवणुकीसाठी गोदामे चालविणे या बाबींचा अंतर्भाव होतो.
सर्व प्रकारचे उत्पादन उद्योग सुरू ठेवण्यात आले आहेत. यामध्ये अन्न प्रक्रिया उद्योग, डेअरी युनिट्स, पशुखाद्य व चारा प्रक्रिया युनिट्स, औषध निर्मिती कारखाने, लस निर्मिती संस्था, वैद्यकीय उपकरणे निर्मिती युनिट्स तसेच या सर्वांना सहाय्यभूत ठरतील अशा सेवा, त्यांची वाहतूक आणि त्यांचे विक्रेते यांच्या सेवा समाविष्ट आहेत

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks