सरपंच सुभाष भोसले यांनी पिराचीवाडीचा लौकिक राज्यभर नेला : आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांचे गौरवोद्गार १५ कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण, आमदार श्री. मुश्रीफसाहेब यांची भव्य मिरवणूक व सत्कार सोहळा संपन्न

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
पिराचीवाडी ता. कागल येथील पहिले लोकनियुक्त सरपंच सुभाष भोसले यांनी गावाचा लौकिक राज्यभर नेला, असे गौरवोद्गार आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी काढले. दुर्गम डोंगराळ कोरडवाहू गावात त्यांनी केलेल्या हरितक्रांतीसह विकासकामांमुळे या गावाचा कायापालट झाला, असेही ते म्हणाले.
पिराचीवाडी ता.कागल येथील १५ कोटी रुपये खर्चून केलेल्या विविध विकासकामांचा लोकार्पण व कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बिद्रीचे संचालक गणपतराव फराकटे होते.
भाषणात आमदार श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, एक सरपंच मनात आणले तर गावचे नंदनवन कसे करु शकतो, याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे सुभाष भोसले आहेत. सत्तेची हवा डोक्यात जावू न देता सरपंच सुभाष भोसले यांनी अत्यंत शांतपणे गावच्या सर्वांगीण शाश्वत विकासाचा अजेंडा तयार केला. गेल्या पाच वर्षात चेहरामोहरा बदलून पिराचीवाडी गावाचे नाव राज्यात विकासाचे माँडेल म्हणून पोहचविले.याचा सार्थ अभिमान आहे.
केडीसीसी बँकेची संचालक प्रताप उर्फ भैया माने म्हणाले, सर्वांगीण ग्रामविकासाचा एक आदर्श नमुना म्हणजे पिराचीवाडी गाव होय.
जिल्हापरिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे म्हणाले, सरपंच सुभाष भोसले यांनी वैयक्तिक संपत्तीसह घरदार पणाला लावून पाणीपुरवठा योजना उभारली व हरितक्रांती झाली.
राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ. शितल फराकटे म्हणाल्या, या कोरडवाहू गावात झालेल्या हरितक्रांतीमुळे माता -भगिनींचे आयुष्य सुखी व समृद्ध बनले आहे.
प्रास्ताविकपर भाषणात सरपंच सुभाष भोसले म्हणाले, दुर्गम, डोंगराळ व सर्व सोयी -सुविधापासून वंचित म्हणून गावाची हेटाळणी व्हायची. ही बाब मनाला अस्वस्थ करायची. कोरडवाहूपणाचा शाप कायमचा पुसून टाकण्यासाठीच पाणी योजना तयार केली व हरितक्रांती झाली. विकासकामांच्या माध्यमातून गावाचा चेहरा -मोहरा बदलू शकलो, याचे आत्मिक समाधान आहे.
यावेळी गजानन लाड,अर्जुन पाटील, दौलती दाभोळे, कु. श्रेया सावंत यांनी मनोगते व्यक्त केली.
व्यासपीठावर ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य सदस्य युवराज पाटील, माजी सभापती जयदिप पोवार, बाजार समिती माजी अध्यक्ष दिनकर कोतेकर, राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब तुरंबेकर, डी. एम. चौगले, निढोरीचे माजी सरपंच देवानंद पाटील, सावर्डेचे माजी सरपंच इंद्रजित पाटील , सागर सावर्डेकर,कल्पना भोसले, उपसरपंच कृष्णात भोसले, ग्रामसेवक व्ही. डी. पाटील, ज्ञानदेव पाटील, नाथाजी भोसले, दत्तात्रय दाभोळे, अरुण भोसले, रामदास भोसले, तानाजी डावरे, तानाजी पाटील आदी उपस्थित होते.
स्वागत टी. व्ही.पाटील यांनी केले. सूत्रसंचालन विशाल बेलवलेकर यांनी केले.
“अमेरिकेतील खेड्यासारखे गाव…….”
काही विघ्नसंतोषी मंडळींनी येथील विकासकामांवर केलेल्या तक्रारीचा सर्वच वक्त्यांनी खरपूस समाचार घेतला. अमेरिकेतील खेड्याप्रमाणे माझ्या मतदारसंघातील पिराचीवाडीची प्रगती अभिमानाची बाब आहे. गावचा स्वाभीमान डिवचला कि गावकरी कसे खवळून उठतात, हे आजच्या नेटक्या नियोजनावरून दिसून आल्याचेही आमदार मुश्रीफ यांनी सांगितले.
“अन् मुश्रीफही भारावले…..”
रस्ते, पाणी यासह सुविधांअभावी होणारी कुचंबणा गावकर्यानी अनुभवली आहे. गेल्या पाच वर्षात आमदार मुश्रीफ यांच्या सहकार्याने आणि सरपंच सुभाष भोसले यांच्या अतीव प्रयत्नातून सर्व सुविधांनी परिपूर्ण गाव अशी ओळख झाली आहे. त्यामुळे गावकर्यांनी मुश्रीफांची जल्लोषी मिरवणूक आणि कृतज्ञतापुर्वक केलेल्या नागरी सत्कार सभारंभाचे नेटके संयोजन पाहून मुश्रीफही भारावून गेले.