ताज्या बातम्यामहाराष्ट्र
आजरा येथे लसीकरण शिबिर संपन्न; २०० नागरिकांनी घेतला लाभ.

आजरा प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
आजरा येथील भगवा रक्षक तरुण मंडळाच्या वतीने कोरोना लसीकरण शिबिर घेणेत आले. या शिबिराचा 200 लोकांनी लाभ घेतला असल्याचे मंडळाचे अध्यक्ष रवी तळेवाडीकर यांनी सांगितले. भगवा रक्षक मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम सतत राबविणेत येत असतात. या शिबिरावेळी संस्थापक संजयभाऊ सावंत, सिद्धेश नाईक, निखील पाचवडेकर, युनूस सयद्, सुमित सावंत, वैभव सावंत व मंडळाचे पदाधिकारी ,सदस्य उपस्थित होते.