संदिप बोटे यांची महाराष्ट्र महा एन.जी.ओ. समितीच्या राज्य संपर्कप्रमुख पदी निवड

पुणे :
अवचितवाडी येथील स्वराज्य निर्माण चे संस्थापक श्री.संदिप शिवाजी बोटे यांची नुकतीच महाराष्ट्र महा एनजीओ फेडरेशन समितीच्या राज्यसंपर्कप्रमुख म्हणून निवड झाली आहे.कोल्हापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून स्वराज्य निर्माण हि संस्था नावारूपाला आणली.लेक वाचवा देश वाचवा,आजची शिक्षण पद्धती, आमचा गाव आमचा विकास, युवक युवतींच्यासाठी स्वराज्य निर्माण युवा कट्टा असे सामाजिक उपक्रम घेऊन संदिप बोटे यांनी समाजासमोर मोठा आदर्श निर्माण केला आहे.आपण ही समाजाचे काही देणे लागतो या उदार हेतूने शैक्षणिक कार्याबरोबरच त्यांचे सामाजिक क्षेत्रात सुद्धा उल्लेखनीय कार्य आहे.शाळेतील गरीब मुलांना गणवेश वाटप करणे,महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करणे,निराधार महिलांना रोजगार मिळावा या करिता शिलाई मशिन वाटप करणे, संसारपयोगी साहित्य देणे अशा अनेक सामाजिक कार्यात त्यांचा मोठा हातभार आहे.त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा विचार करून संदिप बोटे यांना राज्यस्तरीय,जिल्हास्तरीय असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.या पुरस्कारामुळे मला आणखी काम करण्याची प्रेरणा मिळते असे ते नेहमी सांगतात.याशिवाय अनेक सामाजिक संघटनेमध्ये त्यांची महत्वाच्या पदावर नियुक्ती केलेली आहे.एका छोट्याशा गावातून असूनही त्यांचे सामाजिक कार्य वाखाणण्याजोगे आहे.आताच्या कोरोना महामारीमध्ये तर गेले वर्षभर स्वराज्य निर्माण च्या माध्यमातून गरजूंना किराणा वाटप,ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांना मास्क वाटप, पोलीस प्रशासन ला भोजण व्यवस्था याबरोबरच कोरोना जनजागृती मध्ये सतत लोकांसाठी रस्त्यावर उतरून काम करतात..हिच बाब लक्षात घेऊन संदिप बोटे यांची महाराष्ट्र महा एनजीओ फेडरेशन समितीच्या राज्यसंपर्कप्रमुख पदी निवड झाली आहे.आज दिवसभर त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून, स्वराज्य निर्माण आँफिस ला भेटून अनेकजण शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. यामुळे त्यांचे संस्थेचे पदाधिकारी,सामाजिक,राजकिय क्षेत्रातील अनेक मान्यवर यांचेकडून त्यांचे कौतुक होत आहे.