ताज्या बातम्यामहाराष्ट्र

वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर ; नांदेड येथे झालेल्या दुर्घटनेमुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष करु नये – पालकमंत्री मुश्रीफ यांचे आवाहन

प्रतिनिधी : विजय मोरबाळे

वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. नांदेड येथे झालेल्या दुर्घटनेमुळे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जल्लोष करु नये तसेच स्वागतासाठी हार, तुरे आणू नयेत, असे आवाहन पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी केले आहे.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार दि. 6 ऑक्टोबर 2023

रोजी सकाळी 7.20 वाजता कोल्हापूर येथे आगमन व कागल निवासस्थानाकडे प्रयाण. सकाळी 8 ते 10 कागल निवासस्थानी नागरिकांसाठी राखीव. दुपारी 12 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे नियोजन समितीची आढावा बैठक व जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी यांच्या समवेत बैठक. 12.30 वा. विजयादशमी दसरा महोत्सव कार्यक्रमाच्या पूर्व तयारीची बैठक. दुपारी 4 ते 5.30 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह, कागल येथे कागल नगरपरिषद येथे कागल नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक. सायंकाळी 6 वा. शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे राखीव. त्यानंतर सोयीनुसार कागल येथे आगमन व मुक्काम.

शनिवार दि. 7 ऑक्टोबर 2023

रोजी सकाळी 7 ते 10 नागरिकांच्या गाठीभेटीसाठी राखीव (स्थळ-निवासस्थान, कागल). 10.30 वा. भगवान महावीर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था नुतन शाखेच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती (स्थळ- गिजवणे, ता. गडहिंग्लज). दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत गडहिंग्लज, ता. गडहिंग्लज येथील कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या गाठीभेटी (स्थळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय, गडहिंग्लज ) दुपारी 1 वा. गडहिंग्लज नगरपरिषदेची बैठक (स्थळ- शाहू सभागृह, नगरपरिषद, गडहिंग्लज), 4 वा. गडहिंग्लज, ता. गडहिंग्लज तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचा भूमीपूजन कार्यक्रम (स्थळ- उपविभागीय आरोग्य हॉस्पिटल, गडहिंग्लज), 4.30 वा. अत्याळ, ता. गडहिंग्लज येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नुतन इमारतीचे भुमीपूजन (स्थळ- अत्याळ, ता. गडहिंग्लज), सोईनुसार गडहिंग्ल येथून कागलकडे आगमन व मुक्काम (स्थळ -निवासस्थान, कागल).

रविवार दि. 8 ऑक्टोबर 2023

रोजी सकाळी 7 ते 9.30 नागरिकांच्या गाठीभेटीसाठी राखीव (स्थळ-निवासस्थान, कागल). 10 वा. धर्मदाय सह आयुक्त, कोल्हापूर विभाग कार्यालय अंतर्गत महाआरोग्य शिबीरास उपस्थिती (स्थळ- व्ही. टी. पाटील हॉल, ताराराणी विद्यापीठ, राजाराम रोड, कोल्हापूर), दुपारी 12 वा. प्रविण काळबर यांच्या वतीने आयोजित दसरा महोत्सव कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ- छत्रपती शाहू हॉल, कागल), 1 ते 4 वाजेपर्यंत राखीव. सायंकाळी 5 वा. कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीचे लोकप्रतिनिधी, जिल्हा अध्यक्ष यांची सदिच्छा भेट (स्थळ- शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर),

सोमवार दि. 9 ऑक्टोबर 2023

रोजी सकाळी 7 ते 10 नागरिकांच्या गाठीभेटीसाठी राखीव (स्थळ-निवासस्थान, कागल). दुपारी 12 वा. शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे कार्यकर्ते व प्रमुख पदाधिकारी यांच्या गाठीभेटी (स्थळ- शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर), दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत राखीव, 4 वा. के.डी.सी.सी. बँक, कोल्हापूर कार्यकारी समिती बैठक (स्थळ-कोल्हापूर), 5 वा. के.डी.सी.सी. बँक, कोल्हापूर कामगार युनियन यांच्या समवेत बैठक (स्थळ-कोल्हापूर), 6 वा. खाजगी चर्चा (स्थळ-कोल्हापूर), 7 वा. राखीव (स्थळ- शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर), रात्री 8.50 वा. महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks