ताज्या बातम्या
राजाराम कॉलेज 2005-06 12 वी सायन्स बॅचकडून महापालिकेच्या कोवीड केअर सेंटरसाठी सलाईन स्टॅण्ड.

कोल्हापूर : रोहन भिऊंगडे
महापालिकेच्या कोवीड केअर सेंटरसाठी राजाराम कॉलेज 2005-6 12 वी सायन्स बॅचकडून 15 सलाईन स्टॅण्ड दिले. सदरचे साहित्य महापालिकेच्या कर्मवीर विठठल रामजी शिंदे चौकात सहा. आयुक्त विनायक औंधकर, चेतन कोंडे व संदीप घार्गे यांच्याकडे दिले. महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन राजाराम कॉलेज 2005-6 12 वी सायन्स बॅचने सदरचे साहित्य दिले. यावेळी राजाराम कॉलेज 2005-6 12 वी सायन्स बॅचचे शशिकांत माने, संतोष शास्त्री, शरद माळी, मंदार जोशी, विजय पाटील, हर्षवर्धन कदम, पराग कुलकर्णी, ओंकार उपासे, अनिल शिंदे, रणजित कदम उपस्थित होते.