महे गावच्या सर्पमित्र सागर माने यांनी दिले दोन हजार सापांना जीवदान
सावरवाडी प्रतिनिधी :
ग्रामीण भागातील नागरिकांच्या घर, बंगला, परसदार ,जनावरांचा गोठा, लाकडाचा ढिगारा आदि अडचणीच्या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या विविध जातीच्या सापांना पकडून त्यांना जंगलात सोडण्याचे एक सामाजिक वृत जपले आहे . त्याच बरोबर स्मशानभुमीत अर्धवट अवस्थेत जळलेले प्रेत पुन्हा लाकडे टाकून व्यवस्थित अग्नी देण्याचे धाडसी काम करणाऱ्या महे ( ता करवीर ) गावच्या सर्पमित्र सागर माने याने चक्क दोन हजार जीवत साप पकडून त्यांना जीवदान देण्याचा सामाजिक उपक्रम राबविलाआहे . माने यांच्या या उपक्रमाचे समाजातील सर्व थरातून कौतुक होत आहे .
सागर माने याने गावातील प्राथमिक माध्यमिक शाळेत दहावीपर्यत शिक्षण घेत ते शेती व्यससायाकडे वळले .शेतीचे काम करीत असतांना त्यांनी सर्प पकडण्याचा छंद जोपासला , काठीच्या साह्याने ते लहान साप पकडू लागले .जीवंत साप पकडून त्यांना पोत्यात घालुन जंगलात कोणतीही इजा न करीता सोडले जातात . हा छंद त्यांनी गेली दहा वर्ष जोपासला आहे .
सागर माने यांना करवीर तालुक्यातील अनेक गावांत साप पकडण्यासाठी नेतात . ही सेवा ते मोफत करतात त्यांच्या या धाडसी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे .