ताज्या बातम्यामहाराष्ट्र
पेरणोली गावाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध : जीवन पाटील; जिल्हा परिषद सदस्य जीवनदादा पाटील यांची पेरणोली येथील शिष्टमंडळाने घेतली भेट

कूर प्रतिनिधी :
पेरणोली ( ता.आजरा) गावच्या सर्वांगीण विकासासाठी लागेल तो निधी देवू, अशी ग्वाही जि.प.सदस्य जिवनदादा पाटील यांनी दिली.
पेरणोली येथील ग्रामस्थांनी गावचे यूवक नेते संकेत सावंत यांच्या नेतूत्वाखाली आज कूर( ता. भूदरगड) जिल्हा परिषद मतदार संघाचे जि.प.सदस्य जिवनदादा पाटील यांची भेट घेतली.
पेरणोली गावातील ङाॅ. बाबासाहेब आंबेडकर नगरमधील स्मशान शेड, समाज मंदीर संरक्षण भिंत तसेच समाजमंदीर सभोवताली पेव्हिंग ब्लाॅक याकरिता त्यांनी त्यांच्याकडे पाच लाख रूपयांची मागणी केली. यावेळी जिवनदादा पाटील यांनी ग्वाही दिली.
या शिष्टमंडळात यूवक नेते संकेत सावंत, हरिभाऊ कांबळे, दिनेश कांबळे, दादासो पाटील( कोरिवडे), नवनाथ देसाई, यशवंत कोडक, पांडूरंग पाईम, अमर दळवी, नामदेव सावंत, शिवाजी मस्कर आदी उपस्थित होते.