ताज्या बातम्यामहाराष्ट्र
एस. टी. महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा : स्थानक प्रमुख सागर पाटील

कडगाव प्रतिनिधी :
एस.टी. महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, विशेषतः अहिल्याबाई होळकर मोफत पास योजनेचा लाभ विद्यार्थिनी घ्यावा असे आवाहन गारगोटी आगाराचे स्थानक प्रमुख सागर पाटील यांनी केले.
कडगाव येथील कडगाव हायस्कूल व श्री समर्थ कनिष्ठ महाविद्यालयात मार्गदर्शन करण्यासाठी आल्यानंतर ते बोलत होते. त्यांच्यासोबत वाहतूक नियंत्रक शैलेंद्र पाथरवट आणि प्रवीण महाडगुत उपस्थित होते. सर्व विद्यार्थिनींनी या योजनेचा लाभ घ्यावा या संदर्भातल्या सूचना आणि मार्गदर्शन सागर पाटील यांनी केले त्यांचे स्वागत मुख्याध्यापक डॉ. आर. डी. पोवार यांनी केले. यावेळी परिवहन समितीचे सचिव सी.एस. मासाळ, लिपिक वजीर मकानदार, भैरवनाथ राणे, चंद्रकांत लीमकर, अकबर भडगावकर, आत्माराम देसाई, दिलीप पाटील, आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.