ग्रामीण महिलांनी उद्योजक बनून आर्थिक विकास साधावा : संभाजी पाटील

सावरवाडी प्रतिनिधी :
आजच्या स्पर्धाच्या युगात ग्रामीण भागातील महिलांनी परिवर्तनाच्या वैचारिक विकासासाठी स्वयमं उद्योजक बनून आर्थिक विकास साधावा असे प्रतिपादन कुंभी कासारी साखर कारखाण्याचे माजी चेअरमन संभाजी पाटील यांनी केले
करवीर तालुक्यातील कुडित्रे येथील स्वामिनी महिला सेवा संस्थेच्या शाखा उद्घघाटन समारंभात पाटील बोलत होते अध्यक्ष स्थानी गावच्या सरपंच जोत्स्ना पाटील होत्या गावातील महिला साठी झिम्मा फुगडी स्पर्धा आणि दांडिया खेळ आयोजित करण्यात आले होते .,याप्रसंगी गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विश्वास भास्कर , जनार्दन भास्कर अभय गायकवाड, युवराज पाटील आदिचा सत्कार करण्यातआला,
कार्यक्रमात सरपंच जोत्स्ना पाटील अभय गायकवाड आदिनी मनोगत व्यक्त केले , यावेळी विलास पाटील, पंडित मडके,धीरज पाटील, पी.एस.भास्कर, प्रदीप पाटील,रघुनाथ शेलार, नामदेव भास्कर, गणपती कुंभार,सचिन पाटील, विष्णु राऊत, ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गट व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के. एम. किरुळकर तसेच संजय शेलार यांनी आभार मानले.