ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे वाढदिवसानिमित मुरगुडमध्ये महारक्तदान शिबिराचे आयोजन

मुरगूड प्रतिनिधी :विजय मोरबाळे
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुरगूड (ता.कागल) येथे महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरोना पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे यासाठी या शिबिरात तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्यांसंख्येने रक्तदान करावे असे आवाहन केले आहे. या शिबिराच्या नियोजनासाठी मुरगूड मध्ये प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी बोलताना राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे माजी तालुका अध्यक्ष विकास पाटील म्हणाले मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यभर राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य दिले आहे. विकास कामांबरोबरच त्यांनी जपलेला सेवाभावही तितकाच उत्तुंग आहे. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसादिवशी सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प करूया. कोरोना च्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांच्या अधीन राहून रक्तदात्यांनी रक्तदान करण्यास पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. स्वागत प्रास्ताविक मुरगूड शहर राष्ट्रवादी चे शहर अध्यक्ष रणजित सूर्यवंशी यांनी केले