शिरोळ तालुक्यातील लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार साडेतीन कोटी रुपये : संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष प्रकाश पाटील-टाकवडेकर यांची माहिती.

शिरोळ प्रतिनिधी : विनायक कदम
संजय गांधी निराधार योजना , श्रावणबाळ , वृद्धापकाळ , विधवा आणि दिव्यांग यांचे शासनाकडून मिळणारे जानेवारी , फेब्रुवारी व मार्च -२०२१ रोजीचे अनुदान प्राप्त झाले आहे सदरचे अनुदान मिळण्यासाठी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर , जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचेकडे पाठपुरावा सुरु ठेवला होता त्याची दखल घेवून जिल्हाधिकाऱ्यांनी जानेवारी ते मार्च २०२१ अखेरचे अनुदान मंजूर केले आहे . शिरोळ तालुक्यातील जवळपास साडेतीन कोटी रुपये अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती संजय गांधी निराधार योजनेचे नवनियुक्त अध्यक्ष प्रकाश पाटील टाकवडेकर यांनी दिली.
यामध्ये खालीलप्रमाणे योजनानिहाय अनुदान जमा झालेची माहिती त्यांनी दिली :
संजय गांधी निराधार योजना लाभार्थी -५०७३ , अनुदान -१ कोटी ५६ लाख ४४ हजार , श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना लाभार्थी- ७ ९९ ० , अनुदान १ कोटी ६८ लाख ४७ हजार , इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना लाभार्थी ३०७३ , अनुदान १२ लाख ३० हजार ६०० , इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना लाभार्थी -२५० , अनुदान -७७ हजार १०० , इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना लाभार्थी -२० , अनुदान- १८ हजार , राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना ( प्रत्येकी २० हजार प्रमाणे ) लाभार्थी- ३० , अनुदान ६ लाख रुपये याप्रमाणे एकूण १७ हजार १३ ९ लाभार्थ्यांचे अनुदान ३ कोटी ४४ लाख १६ हजार ७०० , शिरोळ तालुक्यात कष्टकरी शेतमजूर लोकांची संख्या मोठी आहे . त्यामुळे आणि राज्य शासनाने निराधाराना जीवनात आर्थिक आधार मिळावा म्हणून सुरु केलेल्या शासकीय योजनेच्या लाभाथ्यांची संख्याही मोठी आहे . लाभाथ्यांना मिळणारे अनुदान न मिळाल्याने प्रपंच चालवण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या . परिणामी संजय गांधी निराधार योजनेचे नवनियुक्त अध्यक्ष प्रकाश पाटील – टाकवडेकर यांनी पद स्वीकारल्यावर प्राधान्याने उर्वरीत अनुदान मिळण्यासाठी जिल्हाधिकारी आणि राज्यशासनाकडे पाठ पुरावा सुरु केला होता . त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जानेवारी ते मार्च -२०२१ चे जवळपास साडेतीन कोटीचे अनुदान मंजूर केले आहे . तसेच संजय गांधी योजनेचे सदस्य सचिव तहसिलदार डॉ.अपर्णा मोरे – धुमाळ व नायब तहसिलदार संजय काटकर व त्यांचे कार्यालयीन कर्मचारी यांनी विशेष परीश्रम घेतले आहे . हे अनुदान संबंधीत लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे . त्याचा तालुक्तील सर्व लाभार्थ्यांनी कोरोनाच्या अनुषंगाने बँकेत गर्दी टाळून लाभ घेणेबाबत आवाहन संजय गांधी शिरोळ समितीचे अध्यक्ष प्रकाश पाटील – टाकवडेकर , सदस्य सचिव डॉ . अपर्णा गोरे – धुमाळ व नायब तहसिलदार संजय काटकर यांनी केले जाते .