व्हनाळीच्या रोहिणी कुळवमोडे यांना आदर्श कर्तुत्ववान महिला पुरस्कार ; अनंतशांती ने घेतली त्यांच्या कार्याची दखल

कुडुत्री प्रतिनिधी :
व्हनाळी (ता. कागल) येथील रोहिणी कुलवमोडे यांच्या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय कर्तुत्ववान महिला पुरस्कार (२०२१) नुकताच बहाल केला केला.
कार्यक्रम प्रसंगी बोलताना संस्थापक अध्यक्ष भगवान गुरव म्हणाले “पतीच्या डोळ्याला अपघात होऊन रोहिणीने मागे न हटता व न डगमगता आपल्या पतीच्या सर्व्हिसिंग व्यवसायात मोलाची मदत केली.अशा कर्तृत्वावान महिलांचा समाजाने आदर्श घेण्यासारखा आहे.असे मत अनंतशांतीचे चे संस्थापक अध्यक्ष भगवान गुरव यांनी व्यक्त केले.
गुरव पुढे म्हणाले “अनंतशांती बहुद्देशीय संस्था तळागळातील काम करणाऱ्या अगदी कर्तुत्ववान लोकांचा सन्मान व सत्कार करत असते. गेली तेरा वर्षे संस्थेने समाजातील लोकांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. आनंत शांती चे हे काम अखंडपणे चालू राहणार आहे. कार्यक्रमा प्रसंगी रोहिणी कुळवमोडे यांचा काल (व्हनाळी ता. कागल) त्यांच्या
कुटुंबासमवेत शाल,फेटा,ट्रॉफी,सन्मानपत्र,बुके देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ माधुरी खोत म्हणाल्या.
संसाराची जबाबदारी पेलत महिला आज सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहिल्या आहेत.महिलांनी महिलांना साथ द्यावी आपली प्रगती साधावी.असेही त्या म्हणाल्या. यावेळी संस्थापक भगवान गुरव अध्यक्ष माधुरी खोत, सचिव अरुणा पाटिल, सुभाष चौगले, सागर लोहार,प्रकाश कारंडे, प्रमोद पाटील, परिसरातील इतर नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार सुभाष चौगले यांनी मानले.