दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठीचे सुधारित वेळापत्रक जाहीर

टीम ऑनलाईन :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एप्रिल – मे महिन्यामध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठीचे सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा आणि लेखी परीक्षेबाबतच्या सूचनांचा त्यात समावेश आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे
दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा 21 मे ते 10 जून
बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे
बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा 22 मे ते 10 जून
40 ते 100 गुणांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटांचा वेळ वाढवणार आहे. तर 40 ते 60 गुणांच्या परीक्षेसाठी 15 मिनिटं वेळ वाढवणार आहे. सुधारित वेळापत्रक www.mahasscboard.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. परीक्षेच्या एक ते दीड तास आधी केंद्रावर हजर राहा, असे कळविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसह पर्यवेक्षक, केंद्रप्रमुखांचं थर्मल स्क्रीनिंग होणार आहे. मास्क, पाण्याची बाटली, स्वत:चं लेखन साहित्य वापरणं बंधनकारक असणार आहे.