सुळये चंदगड येथील सेवानिवृत्त तालुका मास्तर स्व. सौ.अलका देशमुख.

चंदगड प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
सुळये चंदगड येथील रहिवासी व सेवानिवृत्त तालुका मास्तर सौ.अलका शंकर देशमुख वय 68 वर्ष यांचे मंगळवार दि.11 एप्रिल 2023 रोजी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास आकस्मिक दुःखद निधन झाले.त्यांच्या निधनामुळे संपूर्ण तालुका मात्र पोरका झाला आहे.
स्व. सौ.अलका देशमुख यांचा अल्प परिचय थोडक्यात .सौ अलका देशमुख यांचे शिक्षण एस. एस. सी., डी. एड .झाले होते. मात्र, पुढे त्यांनी हलकर्णी येथील वाय. सी. एम. मुक्त विद्यापीठ हलकर्णी येथून बी. ए. चे शिक्षण घेतले यावरून मॅडम यांची शिक्षणाबद्दलची तळमळ दिसून येते.त्या सन 1978ते 82 सालापर्यंत मामासाहेब लाड विद्यालय ढोलगरवाडी येथे शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. यानंतर बोंजुर्डी ,कन्या वि मं चंदगड ,वि मं नागनवाडी,आदी ठिकाणी त्यानी अध्यापिका म्हणून कामकाज पाहिले. यानंतर पुन्हा कन्या वि मं चंदगड येथे रुजू झाल्या .व या ठिकाणी त्यांना तालुका मास्तर या पदावर बढती मिळाली.
सन 2013 साली येथूनच त्या सेवानिवृत्त झाल्या. एकूण 36 वर्ष त्यांनी शैक्षणिक सेवा केली या बरोबरच त्यांनी आपल्या मुलांनाही उच्च शिक्षणाचे धडे दिले .व स्वतःच्या पायावर उभे केले. सौ .देशमुख मॅडम यांचा स्वभाव साधा, मनमिळावू,प्रेमळ असा होता .सामाजिक कार्यात त्यांचा नेहमी सक्रिय सहभाग असायचा. सचिन देशमुख प्रतिष्ठांन मार्फत त्या विविध उपक्रम घेऊन मुलांना प्रोत्साहन देत असत .चंदगड तालुका प्राथमिक शिक्षण संस्थेच्या त्या संचालिका होत्या. डिसेंम्बर 2022 ला त्यांनी लंडन दौराही केला होता .देशमुख मॅडम यांच्या अचानक जाण्याने तालुक्यातुन हळहळ व्यक्त होते आहे .
त्यांच्या पश्यात पती शंकर देशमुख सर(माजी प्राचार्य,खेडूत शिक्षण संस्था चंदगड),मुली अनिता शंकर देशमुख-भूतल(तहसीलदार,महसूल सातारा),डॉ.दिपाली नरेंद्र साखरे(लंडन),नातवंडे अलंकृता,अचिंत्य,अज्ञेय असा परिवार आहे.