रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) कोल्हापूर! रिपब्लिकन पक्षाच्या वतीने भुकेल्या गरजूंना गांधीनगर सह कोल्हापुरात भोजनदान-

रोहन भिऊंगडे /
कोल्हापुर दि 19 :-
कोरोनाचे महाभयंकर संकट महाराष्ट्रासह संपूर्ण देशावर गेल्या वर्षभरापासून आहे याच्यावर उपाय म्हणून राज्य शासनाने कोरोना ची साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्रात लॉकडाऊन केले आहे. कोल्हापुरातील कोरोनाची स्थीती पाहता महाभयंकर आहे संपूर्ण देशापेक्षा कोल्हापुरातील मृत्यू रेट जास्त आहे तसेच रुग्ण संखेत वाढ होत आहे याच्यावर उपाय म्हणून महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यापेक्षा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी कडकं निर्बंध केले आहेत त्यामुळे हॉटेल्स,बेकर्स,किराणा सह बँका ही १००/.बंद आहेत या कडक निर्बंधामुळे रस्त्यावरती राहणाऱ्या भुकेल्या लोकांचे अतोनात हाल होत आहेत याकरिता रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार मा. रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाने भुकेल्यांना अन्नदान, रक्तदान, अन्नधान्य वाटप करण्याचे आदेश रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना ना.आठवले साहेब यांनी दिली आहेत त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्हा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तसेच कालकथित:हौसाआई बंडू आठवले (फाउंडेशन)कोल्हापूर यांच्या वतीने भुकेल्या गरजूंना भोजनदान करण्यात आले यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा नेते आयु सतीश माळगे यांनी अशी माहिती दिली की केंद्रीय मंत्री ना:रामदास जी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार येणाऱ्या लॉकडाउनच्या काळात रक्तदान शिबिरा सह अन्नधान्य वाटपाचे कार्यक्रम कोल्हापूर जिल्हा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने राबवण्यात येणार आहेत यावेळी आयु:उमेश माने(आण्णा),पैलवान. सनी बाचणे, सतीश यादव, भरत कांबळे, रोशन कांबळे, प्रथमेश कांबळे, मोहम्मद चौधरी, रतेश कांबळे, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य मा:अरुण कुमार भोसले साहेब (सरनोबतवाडी)मा.रवाब खान (चाचा)तसेच भोजन बनवण्याचे काम रमाई माता महिला बचत गट मनेर मळा, उंचगाव अध्यक्ष आयु: अर्चना माळगे,सचिव आयु:बिना कांबळे यांचे विशेष आभार..