वाचन हे मनाचे खाद्य आहे, वाचन हेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा पाया आहे – निखिल मांगले

कडगाव :
अभ्यास करून काय फायदा, नोकरी कुठे मिळते, अशी भावना विद्यार्थ्यांच्यात सार्वत्रिकपणे दिसून येते. पण कठीण परिश्रम घेऊन ,वाचन करून ज्ञान मिळवल्यास आपल्याला यश प्राप्त होते .तंत्रज्ञानाने सर्व जग जवळ आलेले आहे .या तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्यांनी उपयोग करावा असे मत निखिल मांगले यांनी व्यक्त केले.
कडगाव येथील कडगाव हायस्कूल कडगाव व श्री समर्थ कनिष्ठ महाविद्यालय त व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे बोलत होते. राजा शिवछत्रपती व संभाजी महाराज यांचे अनेक दाखले देत ज्ञान व अनुभव यांची जोड घातली तर यश प्राप्त होते. कंटाळा न करता विद्यार्थ्यांनी पुस्तकाच्या वाचनाबरोबरच अवांतर वाचनाकडेही लक्ष द्यावे, वाचन करावे, मनन करावे, आणि चिंतन करून आपले वेगळेपण सिद्ध करावे असे मत त्यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे अनेक उदाहरणांच्या सह मांगले यांनी दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ. आर. डी. पोवार होते. स्वागत व प्रास्ताविक ए .डी . देसाई यांनी केले यावेळी सीएस लिमकर ,सत्यजित चोरगे, भैरवनाथ राणे, भोसले सर , कातरुट सर, डी जी पाटील शिक्षकेतर कर्मचारी वजीर मकानदार, सर्जेराव पाटील, अजित कांबळे, रघुनाथ पाटील व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता सूत्रसंचालन ए .एम. भडगावकर यांनी केले चंद्रकांत मासाळ यांनी सर्वांचे आभार मानले.