समाज हितासाठी रविश पाटील यांचे योगदान मोलाचे : आमदार पी. एन. पाटील

कुडूत्री प्रतिनिधी
रविश पाटील यांनी रामचंद्र तवनापा मुग यांची (कोल्हापूर) निवडक डाळी,धान्य व मसाले (मॉल)शाखेची निर्मिती करून सर्वसामान्यांना निवडक धान्य उपलब्ध करून दिले आहे.त्यामुळे परिसरात विश्वासाहर्ता जोपासली जाणार आहे. याचा आम्हाला खूप सार्थ अभिमान आहे.ते अनेक वर्षे समाज हिताचे कार्य राबवत आहेत.आणि त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.असे मत आमदार पी. एन. पाटील यांनी भोगावती(ता.करवीर)येथे अध्यक्षस्थानाहून बोलताना व्यक्त केले ते बाळासाहेब पाटील कौलवकर सह. शेती प्रक्रिया संघाच्यावतीने आयोजित निवडक धान्य मसाले, मॉल शाखेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या शाखेचे उद्घाटन आमदार पी एन पाटील यांच्या शुभ हस्ते फीत कापून व श्रीफळ वाढवून करण्यात आले.
प्रास्ताविक करताना रविश पाटील म्हणाले. निव्वळ संघामार्फत खत पुरवणे हा उद्देश नसून चांगल्या दर्जाच्या जीवनावश्यक वस्तू कमी नफ्यात देणे हा त्या मागील उद्देश आहे.त्यासाठी या रामचंद्र तवणापा मुग या शाखेची आम्ही निर्मिती केली आहे.
कार्यक्रमात आमदार पाटील यांच्या सह सर्वच मान्यवर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी शेतकरी संघटनेचे प्रा.जालंदर पाटील, महावीर मुग यांनी आपली मनोगते व्यक्त केलीत.
कार्यक्रमास आमदार पी. एन.पाटील,भोगावती चे उपाद्यक्ष उदयसिंह पाटील,पी.डी. धुंदरे,महावीर मुग, धनाजीराव देसाई,हिंदुराव चौगले,बी.के.डोंगळे,बी.आर.पाटील, ए. डी.पाटील,सर्जेराव पाटील,प्रभाकर पाटील,जालंदर पाटील,सौ,वंदना हळदे,संजयसिंह पाटील,उत्तम पाटील,शिवाजी कारंडे, विट्टल कांबळे,विश्वनाथ पाटील,वसंतराव पाटील,सचिन वारके,जयसिंगराव हूजरे,धीरज डोंगळे,पी.बी.कवडे,रमेश बचाटे,सुधाकर साळोखे,नवज्योत देसाई, आनंदा माळवी, बंडा वाडकर आदी उपस्थित होते.
आभार माजी उपसभापती रविश पाटील यांनी मानले.